सहकारी सोसायटीचे कार्यालय फोडले !

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

प्रतिनिधी —

संगमनेर शहर आणि तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरट्यांनी आता थेट एका सोसायटीचे कार्यालय फोडले असल्याची माहिती समोर आली असून चोरट्यांनी सोसायटी मधील साहित्य चोरून नेले आहे.

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकुर फाटा या ठिकाणी असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे कार्यालय फोडण्यात आले. या सोसायटी मधून कर्जुले पठार, डोळसणे, पोखरी बाळेश्वर, पिंपळगाव देपा या गावांचे काम पाहिले जाते.

अज्ञात चोरट्यांनी सोसायटीच्या कार्यालयातून लॅपटॉप व इतर वस्तू चोरून नेल्या आहेत. बाळू रामभाऊ वाळुंज (रा. गुंजाळवाडी पठार, तालुका संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. सोसायटीच्या कार्यालयातून लॅपटॉप चोरी करण्यात आले असून साधारण ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याची नोंद करण्यात आली आहे. घारगाव पोलिसांनी या संदर्भात गुन्हा घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवलदार लोंढे हे करत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!