निळवंडे कालव्यांचे तांत्रिक साहित्य चोरले !

प्रतिनिधी —

राजकारण्यांच्या ऐरणीवर असणारे निळवंडे धरणाचे कालवे आता चोरट्यांच्या ऐरणीवर आले आहेत. संगमनेर तालुक्यात कोकणगाव शिवारात निळवंडे कालव्याच्या कामाचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना घडली आहे.

निळवंडे कालव्यांची कामे काही ठिकाणी सुरू आहेत. या कालव्याचे काम संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात चालू होते. या ठिकाणावरून सुमारे ७० हजार रुपयांचे विविध तांत्रिक साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोशन किशोर खरात (रा. वाडेकर गल्ली, संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलीस ठाणे अंमलदार जायभाये हे पुढील तपास करत आहेत.

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!