संगमनेरात कत्तलखान्यावर छापा ! 

६०० किलो गोवंश मांस जप्त

प्रतिनिधी —

संगमनेर शहरात अवैधरीत्या गोमांस विक्री सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून १ लाख २० हजार ५०० रुपये किमतीचे ६०० किलो गोवंश मांस जप्त केले आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बक्कर कसाब मस्जिद जवळ, कसाईवाडा, संगमनेर या ठिकाणी गोवंश जातीचे जिवंत जनावरे कत्तल करुन गोमांस विक्री करीत आहेत.

खात्रीशीर माहिती मिळाल्याने संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दाभाडे व पोलीस अंमलदार यांना मदतीकरीता घेवून बक्कर कसाब मस्जिद जवळ कसाईवाडा, संगमनेरया ठिकाणी छापा टाकला असता जनावराची कत्तल करणारे आरोपी पोलीसांना पाहुन पळून गेले.

त्यापैकी १) शफिक महंमद कुरेशी रा.गल्ली नं.९,जमजम कॉलनी, संगमनेर, २) शेहबाज गुलफाम कुरेशी रा. मोगलपुरा,संगमनेर यांचा पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचेकडे पळून गेलेल्या आरोपीबाबत विचारपुस करता पळून गेलेल्या आरोपीची नावे ३) मुजाहित उर्फ मुज्जु दौला कुरेशी, ४) हारुन सुलतान कुरेशी, ५) कलीम जलील कुरेशी, ६) शाहिद इर्शाद कुरेशी, ७) उमर शकुर कुरेशी, ८) खलील बुढन कुरेशी सर्व रा.मोगलपुरा, संगमनेर अशी आहेत.

पोलीस नाईक सचिन दत्तात्रय अडबल नेम स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन संगमनेर शहर

पोलीस स्टेशन गु. र. नं. १००१/२०२३ भादवि कलम २६९, ३४ सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन १९९५ चे सुधारीत २०१५ चे कलम ५ (क) ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे,पोना/सचिन अडबल, पोकॉ/आकाश काळे,मच्छिंद्र बर्डे,अमृत आढाव यांनी सहभाग घेतला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!