संगमनेर येथील युवकांनी केली वृद्धाश्रमात दिवाळी साजरी !

प्रतिनिधी —

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अकोले तालुक्यातील राजूर-भंडारदरा रोड जवळील कै.नानासाहेब देशमुख वृद्धाश्रम इथे संगमनेर येथील ‘जिगरी मित्र परिवाराच्या’ वतीने येथील आजी आजोबांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.

ह्या उपक्रमाचे यंदाचे हे पाचवे वर्ष होते. दिवाळी निमित्त फराळाचे विविध पदार्थ तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून ‘केअर किट’ भेट म्हणून देण्यात आली.

इथे असणारे आजी – आजोबां सोबत दरवर्षी दिवाळी साजरा करण्याची आणि भेटवस्तू देण्याचा उपक्रम मित्रांनी सुरु केली. दिवाळी म्हणजे आनंद व उत्साहाचा सण, आनंद हा खऱ्या अर्थाने वाटल्याने द्विगुणित होतो, समाजातील एका दुर्लक्षित घटकासोबत आनंदाचे काही क्षण वाटण्यासाठी ह्या वृद्धाश्रमात दिवाळी साजरी करण्याची संकल्पना असल्याचे प्रथमेश बेल्हेकर यांनी सांगितले.

त्यासोबतच त्यांनी देशमुख वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन आदर्शवत व अनोखे असल्याचे सांगत संस्थेचे अध्यक्ष ॲड. मनोहर देशमुख यांचे आभार मानले. याप्रसंगी संभव लोढा, संकेत घोडेकर, जितेश मिलानी, श्रेयश करपे, विवेक कोथमिरे, प्रितेश नवले, अनिल केदारी, दर्शन गायकवाड उपस्थित होते.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!