दरोड्याचा बनाव करून पतीचा खून करणाऱ्या पत्नीस अटक !

स्थानिक गुन्हे शाखा नगर व श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी —

लैंगिक टॉर्चर करणाऱ्या पतीला वैतागून त्याच्या पत्नीने दुधामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून गुंगीचे औषध दिले व त्यानंतर ओढणीच्या साह्याने गळा आवळून त्याचा खून केला व घरामध्ये दरोडा पडला पैसे आणि दागिने चोरीला गेल्याचा बनाव करीत खून करून नामा निराळा होण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीस स्थानिक गुन्हे शाखा नगर व श्रीरामपूर शहर पोलिसांनी एका दिवसात गुन्ह्याचा छडा लावून अटक केली आहे.

नदीम रशीद पठाण असे मयत पतीचे नाव असून बुशरा नदीम पठाण (राहणार एकलहरे तालुका श्रीरामपूर) असे अटक करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील कोल्हार रोडवर एकलहरे शिवारात नदीम रशीद पठाण यांच्या घरी दरोडा पडल्याची बतावणी करत आणि सात लाख रुपये रोख रक्कम व काही दागिने चोरीला गेल्याचा बनाव करीत पतीला दरोडेखोरांनी ओढणीच्या साह्याने गळफास लावून ठार मारले व पत्नीस गंभीर जखमी केले असा देखावा करीत स्वतःच्या पतीची हत्या करणाऱ्या या महिलेला पोलिसांनी चतुराईने तपास करून तात्काळ अटक केली आहे.

विशेष म्हणजे पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून तपासही चालू केला होता. परंतु पोलिसांनी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळवली असता सदर ठिकाणी दरोडा झाला नसल्याचे समजले. तसेच घटनास्थळी तांत्रिक विश्लेषण करून पाहणी केली असता संशयास्पद गोष्टी आढळल्या. त्यामुळे पोलिसांनी मयत नदीम याचा अंत्यविधी होताच त्याची पत्नी बुशरा हिला ताब्यात घेतले.

गुन्ह्यातील महिला बुशरा नदीम पठाण हिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने प्रत्येक वेळी वेगवेगळी हकीकत सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी तिला बोलती केली असता तिने माझा पती हा मला सुमारे पाच ते सात वर्षांपासून नेहमी लैंगिक टॉर्चर करत होता. याच रागातून मी माझा पती यास दुधामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून त्याला गुंगी आल्यानंतर साडीचे एक टोक घराच्या खिडकीच्या गजाला बांधून साडीने त्याचा गळ्याला आवळून साडीचे दुसरे टोक दोन्ही हाताने ओढून त्याला ठार केले. आमच्या घरातील कोणतेही पैसे अगर दागिने चोरीला गेले नाहीत अशी कबुलीही सदर महिलेने दिली. त्यामुळे गुन्हा तात्काळ उघडकीस आला आहे.

सदर प्रकरणात श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डॉ. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नगरचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक, पोलीस हवालदार मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, रविद्र कर्डिले, पोलीस शिपाई सागर ससाणे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, महिला पोलीस मिरा सरग, तसेच हर्षवर्धन गवळी पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, यांच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. बी. बोरसे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, दादाभाई मगरे, सुरेखा देवरे, महिला पोलीस हवालदार शफिक शेख, हवालदार राजेश सुर्यवंशी, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, रामेश्वर ढोकणे, विरअप्पा करमल, राहुल नरवडे, गौतम लगड, संपत बडे, हरिभाऊ पानसबळ, गणेश गावडे, रमिझराजा अत्तार, भारत तमनर, मच्छिद्र कातखडे, संभाजी खरात, नंदु लोखंडे, आकाश वाघमारे, योगिता निकम, यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!