एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या !

जावईच निघाला आरोपी

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

जावयाने धारधार शस्त्राने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून मयत सर्व एकाच कुटुंबातील आहेत.

राहता तालुक्यातील सावळीविहीर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात मेहुणी गंभीर जखमी झाली आहे. कौटुंबिक वादातून हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सावळीविहीर गावात व शिर्डी पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

सुरेश निकम नावाच्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी संगमनेर येथील आहे.

पत्नी वर्षा सुरेश निकम, मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड, आजे सासू हिराबाई द्रौपद गायकवाड अशी या घटनेत मदत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

आरोपी सुरेश निकम याचा आपल्या पत्नीसोबत आणि तिच्या माहेरच्या मंडळीशी अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. पत्नी माहेरी राहत असल्याने पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याचे समजते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास रागाच्या भरात आरोपी सुरेश निकम याने पत्नीच्या माहेरच्या घरात घुसून पत्नीच्या पत्नीसह मेहुणा, आजेसासू यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. पत्नी, आजे सासू , मेहुणा हे मयत झाले असून सासू, सासरे आणि मेहुणी गंभीर जखमी झाले. शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

शिर्डी पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आरोपी जावई सुरेश निकम याला नाशिक जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले असून कौटुंबिक वादातून हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. ­

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!