विद्यार्थिनीने पाठवलेली राखी क्रिकेटर शिखर धवनने स्वीकारली !

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील पनोडी येथील बालपण स्कूलच्या विद्यार्थिनीने ‘टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू’ या उपक्रमा अंतर्गत पर्यावरण पूरक बनवलेली राखी भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन याला पाठविली होती. त्याने ही राखी स्वीकारली असून राखीसह स्वतःचे छायाचित्र बालपण स्कूल (पानोडी) यांना पाठविले आहे. शिखर धवन च्या या कृती मुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.

पर्यावरण पूरक राख्या बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या होत्या. पर्यावरणावर काम करणाऱ्या भारतातील विविध संस्थांना आणि व्यक्तींना या राख्या पाठवण्यात आल्या आहेत. सर्वांनी या पर्यावरण पूरक राखीचा स्वीकार केला आहे. त्यातील विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा सुप्रसिद्ध सलामी फलंदाज शिखर धवन यानेही या राखीचा स्वीकार केला.

धनश्री विजय जोरी या इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने तयार केलेली ही राखी शिखर धवन याला पाठवली होती. त्यासोबत विद्यार्थिनीने स्वहस्ताक्षरात लिखित संदेशही पाठविला होता. या संदेशाचा आणि राखीचा स्वीकार करत शिखर धवन याने स्वतःच्या छायाचित्रासह राखी स्वीकारल्याचे बालपण हायस्कूलला कळविले आहे.

शाळेच्या आवारातील झाडांना व पोलीस बांधवांना राख्या बांधून बालपण शाळेच्या वतीने रक्षाबंधनाचा उपक्रम यावर्षी साजरा करण्यात आला. या उपक्रमासाठी सर्व शिक्षक वर्ग आणि बालपणच्या प्रमुख सोनाली मुंढे यांनी विशेष परिश्रम घेतले. मुंढे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!