संगमनेर बस स्थानकावर सोन्याचे गंठण व रोख रक्कम चोरली !

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील बस स्थानकावर गंठण चोरी, पाकीट मारी, पर्स चोरीचे प्रमाण नेहमीच वाढते राहिले आहे. या चोरीला आळा घालण्यास शहर पोलिसांना नेहमीच अपयश आले आहे. सातत्याने या चोरीच्या घटना घडतच आहेत.

सोमवारी दुपारी संगमनेर बस स्थानकावर पुन्हा गंठण चोरीचा प्रकार झाला असून यामध्ये ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण आणि रोख ५ हजार ५०० रुपयांची रक्कम, ओळखपत्र आणि एटीएम कार्ड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे.

यासंदर्भात सुनिता रामकृष्ण पोखरकर (राहणार सारोळे पठार, तालुका संगमनेर) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!