संत शिरोमणी नामदेव महाराज सभागृहासाठी दहा लाख रुपयांचा निधी — आमदार डॉ. लहामटे
प्रतिनिधी —
संत शिरोमणी नामदेव महाराज सभागृहासाठी दहा लाख रुपयांचा निधी देणार असून त्यासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही तसेच अकोले शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. अशी माहिती आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिली आहे. संत नामदेव महाराज समाधी सोहळ्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात लहामटे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रमिला गुजर होत्या. यावेळी ह.भ.प. सुकदेव महाराज, ह.भ.प. चेतन महाराज भांगरे, जेष्ठ विधिज्ञ वसंत मनकर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अंकुश वैद्य, अक्षय आभाळे, अमित नाईकवाडी आदिसह महिला, पुरुष व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समाजाचे अध्यक्ष संतोष खांबेकर, ॲड. वसंत मनकर यांची मनोगते झाली.

आमदार लहामटे पुढे म्हणाले की, अकोले शहरातील विविध विकास कामासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये कारखाना रस्ता, प्रवरा घाट, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, गुजरी रस्ता अशी कामे असून तालुक्यात एमआयडीसी चे लवकरच भूमिपूजन करणार आहे. चाळीस वर्षांचा बॅकलॉग एका वर्षात भरून काढणे कठिण आहे. पण मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आज पर्यंत देव आणि जनता माझा पाठीराखा असून राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा पण सुख दु:खात एकत्र या. असे ही डॉ. लहामटे म्हणाले.

यावेळी आमदार लहामटे यांनी स्वखर्चाने संत नामदेव महिला भजनी मंडळास टाळ, मृदूंग, हार्मोनियम, वीणा भेट दिली. व महिलांचे भजन ऐकण्यासाठी नक्की येईल असे आश्वासित केले. स्वागत श्रीनिवास रेणुकादास यांनी केले. प्रास्ताविक अनंत खांबेकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष खांबेकर, मनोज खांबेकर, अनंत कल्याणकर, संजय गुजर, चंद्रकांत खर्डे, सुनील गुजर, प्रमोद भुसे, ज्ञानेश्वर खांबेकर, अनिल गुजर, रमेश गुजर, संदीप गुजर, राजेंद्र गुजर, मंगेश खांबेकर, ज्ञानेश्वर अवसरकर, विकास अवसरकर, नंदुशेठ गुजर, चंद्रकांत भुसे, जगन खर्डे, देवेंद्र गुजर, विजय गुजर, संतोष रंगनाथ खांबेकर, पंकज गुजर, अनिता गुजर, रुपाली गुजर, सुनीता गुजर, शुभदा खांबेकर, राणी खांबेकर, गीता खांबेकर, साधना गुजर, दीप्ती गुजर, रुपाली रेणुकादास, रेखा सातपुते, मोनिका गुजर आदिसह सर्व शिंपी समाजातील महिला व पुरुषांनी परिश्रम घेतले.

