उज्ज्वल भविष्यासाठी जीवनात स्वयंशिस्त बाळगावी — प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड             

प्रतिनिधी —

महाविद्यालयीन काळात विद्यार्थी दशेत योग्य ती दिशा अचुक मार्गदर्शन, कठोर मेहनत घेण्याची तयारी व स्वयंशिस्त अंगी बाळगावी तर नक्कीच भविष्य उज्वल बनविता येते असे प्रतिपादन संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड यांनी स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम अंतर्गत ‘मी माझ्या महाविद्यालयाचा’ या नाविन्यपुर्ण अशा उपक्रमाच्या समारोपप्रसंगी केले. यावेळी स्टुडंट इंडक्शन प्रोग्रामचे प्रमुख डॉ. दिगबंर घोडके, वाणिज्य एस.आय.पी समन्वयक डॉ. एस.जी वडघुले, कला शाखेच्या समन्वयक डॉ. एस.बी. शिरोडे व बीबीए व बीबीए (सीए) विभागाचे समन्वयक प्रा.टी. टी. खेमनर आदी उपस्थित होते.

चार दिवस चाललेल्या या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी विविध विभागाच्या विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना आपल्या विभागाची व विषयांची माहीती करुन दिली व आपण निवडलेल्या अभयासक्रमातील करिअर संधी याबद्दल अवगत केले. तसेच दुसऱ्या दिवशी महाविद्यालयातील विविध पायाभुत सुविधा यांची माहीती करुन दिली.

उपप्राचार्य डॉ. आर.एस. लढ्ढा व उपप्राचार्य डॉ.आर.बी. तासिलदार यांनी उपक्रमाच्या तिसऱ्या दिवशी नवीन शैक्षणिक धोरण २०२० बद्दल विद्यार्थ्यांना अवगत केले. नवीन शैक्षणिक धोरणाची अमंलबजावणी करत  असताना येणाऱ्या अडचणी व या धोरणानुसार  शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नवीन करिअर संधी त्यांनी विद्यार्थ्यांना उलगडून सांगितल्या.

उपक्रमाच्या शेवटच्या दिवशी प्राचार्य गायकवाड यांनी बारावी नंतर पदवीच्या शिक्षणासाठी सं.न.कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य व ब.ना.सारडा विज्ञान महाविद्यालयात २०२३-२४ साठी पहिल्या वर्षासाठी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत प्रगतीचायावेळी त्यांनी उल्लेख केला.

१९६१ साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयाला उज्वल यशाची परंपरा असल्यामुळे महाविद्यालय स्वायत्त होऊ शकले व त्यातून विद्यार्थी प्रिय महाविद्यालय म्हणून नावारुपाला आले असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी महाविद्यालयात चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहीती यावेळी प्राचार्यानी दिली.

विद्यार्थ्यांना सर्वोत्तम  शैक्षणिक  वातावरण व  गुणवत्ता पुर्ण तसेच रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे आश्वासन  देत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाविद्यालयाचे सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख डॉ. जितेद्र पाटील यांनी सांस्कृतिक मंडळ चालवत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहीती विद्यार्थ्यांना दिली. राष्ट्रीय सेवा योजनेची माहीती डॉ.रोशन भगत तर राष्ट्रीय छात्र  सेनेची माहीती प्रा. राजू त्रिभुवन यांनी दिली. कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका या योजनेची माहीती डॉ.हनुमंत कुरकुटे यांनी दिली तर शिष्यवृत्तीबाबत विजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाच्या अर्घ्य मासिकाविषयी डॉ. उमेश जगदाळे यांनी माहीती दिली.

‘मी माझ्या महाविद्यालयात” या उपक्रमाचे प्रास्ताविक व परिचय डॉ. दिगंबर घोडके यांनी केला. प्रा. अनिल गोसावी यांनी सुत्रसंचालन केले तर उपस्थितांचे आभार प्रा. तुकाराम खेमनर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विभागातील सर्वांनी विशेष श्रम  घेतले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!