माजी आमदार रमले गणिताच्या वर्गात !
प्रतिनिधी —
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांची शिक्षणाप्रतीची तळमळ ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असून त्यांनी इयत्ता तिसरीच्या वर्गात चिमुकल्यांना गणित विषय शिकवून बराच वेळ विद्यार्थ्यांची संवाद साधला.

शिबलापुर येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल आमदार डॉ. तांबे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत संस्थेचे रजिस्ट्रार बाबुराव गवांदे, सह सेक्रेटरी दत्तात्रय चासकर, डॉ. संजय सांगळे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या विद्यालयाच्या पाहणी करताना माजी आमदार डॉ. तांबे यांनी तिसरीच्या वर्गात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना गणित हा विषय शिकवला.

ज्ञानमाता विद्यालयातून प्रथम आलेल्या आमदार डॉ. तांबे यांनी पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेज मधून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. एम एस पदवी घेतल्यानंतर त्यांनी संगमनेर मध्ये आरोग्य सेवा सुरू केली अत्यंत निष्णांत सर्जन असलेल्या आमदार डॉ. तांबे यांची सामाजिक कार्याची आवड, वाचन, मूकबधिर व दिव्यांगासाठीचे कार्य, शिक्षणा प्रतीची तळमळ, आरोग्य व्यवस्थेबद्दलची काळजी नेहमीच त्यांच्या वक्तव्यातून आणि कृतीतून व्यक्त होते.

शिक्षणाप्रती असलेल्या तळमळीतून त्यांनी इयत्ता तिसरीच्या वर्गात छोट्या चिमुकल्यांना गणित हा विषय शिकवला. हातात खडू, डस्टर घेऊन विद्यार्थ्यांना शिकवताना ते रमले. दीड तास विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत आमदार डॉ. तांबे यांनी गणित शिकवले. याचबरोबर प्रश्न – उत्तरे घेत विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.

डॉ. तांबे म्हणाले की, विद्यार्थी जीवन हे माणसाच्या जीवनातील सर्वात सुंदर जीवन असते. आमदार बाळासाहेब संगमनेर तालुक्यात ग्रामीण व शहरी अशा सर्व शाळांमधून गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जात असून परिपूर्ण विद्यार्थी घडवले जात असल्याचेही ते म्हणाले.

