नगर जिल्ह्यात गांजा आणि अफूची शेती !

१५ लाखांचा मुद्देमाल जप्त ; दोघांना अटक

प्रतिनिधी —

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असणाऱ्या शहापूर आणि देवगाव शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने छापा घालून गांजा आणि अफूची शेती करणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून १४ लाख ९५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यामध्ये लांजा आणि अफूची झाडे व बोंडे आहेत.

बाबुराव लक्ष्मण साळवे (रा. शहापूर, तालुका नेवासा) आणि रावसाहेब भागुजी गिलबिले (रा. देवगाव, तालुका नेवासा) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून गुप्त खबर मिळाली की, नेवासा तालूक्यातील शहापूर शिवारामध्ये बाबुराव साळवे व देवगांव शिवारामध्ये रावसाहेब गिलबिले यांनी गव्हाच्या शेतामध्ये बेकायदेशिररित्या गांजा व अफुच्या झाडांची लागवड केलेली आहे.

पथकाने संशयित ठिकाणी नेवासा येथे जावून मिळालेल्या माहितीची खात्री करुन, स्थानिक पोलीस, पंच व इतर साधने सोबत घेऊन प्रथम शहापुर, ता. नेवासा येथील बाबुराव लक्ष्मण साळवे याच्या गव्हाच्या शेतामध्ये अडीच फुट उंचीची दोन व घरा समोर ८ फुट उंचीचे एक गांजाचे झाड तसेच घरा समोर पोत्यावर गांजाच्या झाडाचा पाला काढुन तो वाळवण्यासाठी ठेवल्याचे दिसून आल्यावर छापा टाकून सदर शेतातून १ लाख ११ हजार ४२० रुपये किंमतीची तीन गांजाची लहान मोठी हिरवी झाडे कारवाई करुन जप्त केली.

तसेच देवगांव, ता. नेवासा येथे रावसाहेब भागुजी गिलबिले याच्या शेताची पाहणी केली असता शेतात अफुच्या झाडांची लागवड केल्याचे दिसून आल्याने छापा टाकून शेतामधून  १३ लाख ८४ हजार रुपये किंमतीची ६९ किलो ५०० ग्रॅम वजनाची लहान मोठी ६२१ अफुची झाडे व बोंडे कारवाई करुन जप्त करण्यात आली.

पोलीस निरीक्षक मिटके स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, सहाय्यक फौजदार विष्णु घोडेचोर, पोलीस हवालदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक शंकर चौधरी, संदीप दरदंले, पोलिस शिपाई शिवाजी ढाकणे, पोलिसांना नाईक भाग्यश्री भिटे, पोलिस शिपाई  ज्योती शिंदे व चालक पोलीस हवालदार बबन बेरड यांनी ही कारवाई केली आहे.

संदीप संजय दरदंले, नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ३०९/२०२३ एन.डी. पी.एस. कायदा कलम ८ (क), १५, १८, २० (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!