संगमनेर बस स्थानकावर पुन्हा सोनसाखळीची चोरी !

प्रतिनिधी —

संगमनेर बस स्थानकात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. पुन्हा एकदा अज्ञात चोरट्याने सोनसाखळी चोरण्याचा प्रताप संगमनेर बस स्थानकात केला आहे.

संगमनेर बस स्थानकात पाकीट मारी, सोनसाखळ्याची चोरी, पर्स चोरी असे प्रकार सातत्याने होत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच बसमध्ये चढत असताना एका महिलेचे तीन तोळ्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. त्यानंतर लगेचच पुन्हा पाठोपाठ सोन्याची साखळी चोरण्याची घटना घडली आहे.

रामदास पाराजी खेमनर (राहणार जनता नगर, संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून संगमनेर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार खाडे हे घटनेचा तपास करत आहेत.

संगमनेर शहर पोलिसांनी नुकतीच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार सायकल चोरी करणारी टोळी पकडली त्यांच्याकडून मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. अशा कारवायांमध्ये सातत्य असायला हवे असे नागरिकांचे मत आहे. बस स्थानकावर पोलीस चौकी आहे. या पोलीस चौकीचा किती उपयोग होतो हे अद्याप समजले नाही. तरी पोलिसांनी बस स्थानकावरील चोऱ्यामाऱ्यांना आळा घालावा अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!