संगमनेर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ ; घरफोड्यांचे सत्र सुरूच !

आश्वी, घारगाव मधून दागिने लंपास…

चार पोलीस ठाणे आणि पोलीस उपअधीक्षकांचे कार्यालय असून देखील संगमनेर तालुक्यातील चोऱ्या, घरफोड्या, अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर पोलिसांना नियंत्रण मिळवण्यात अपयश येत आहे. संगमनेर उपविभागासाठी पूर्ण वेळ पोलीस उपअधीक्षक यांची नेमणूक नाही. सध्या शिर्डी येथील पोलीस उपअधीक्षक हे संगमनेर उपविभागाचे काम पाहत आहेत.

 

प्रतिनिधी —

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि संगमनेर तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा एवढा वाढला आहे की, संगमनेर शहर आणि तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून घरफोड्यांचे सत्र बंद होत नसल्याचे चित्र आज उघडकीस आले आहे. तालुक्यातील आश्वी आणि घारगाव या पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करण्यात आल्या असून शहरात देखील मोटार सायकल, मोबाईल चोऱ्यांचे प्रकार सुरूच आहेत.

विशेष म्हणजे या घरफोड्या आणि चोऱ्या दिवसाढवळ्या घडल्या आहेत. तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून १ लाख २६ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिन आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली आहे.

रोहिदास चिमाजी दिघे (रा. वरवंडी, ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे की, आमच्या राहत्या घरी वरवंडी खांबे येथील घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटात असलेल्या लॉकर मधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली आहे. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून पोलीस सब इन्स्पेक्टर पवार हे तपास करत आहेत.

तर घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून चोरट्यांनी १९ हजार ५० रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले आहेत. या संदर्भात नानू तुकाराम खेमनर (रा. हिरेवाडी, साकुर, ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे.

कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील सामानाची उचकापाचक करीत १४ हजार ५०० रुपये रोख आणि पाच हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पट्ट्या चोरून नेल्या आहेत. पोलीस नाईक लोंढे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. तर संगमनेर शहरात मोबाईल चोरी आणि मोटरसायकल चोरीच्या घटना सातत्याने सुरूच आहेत.

तर दुसरीकडे कर्जुले पठार या ठिकाणी घरफोडी झाली असून तीस हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेण्यात आले आहेत. या संदर्भात अलका भाऊसाहेब देवके (रा. कर्जुले पठार, ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे. घरातील लोखंडी कपाटामधून दहा हजार रुपये रुपये रोख व सोन्याचे मनी मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले आहे. सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले हे पुढील तपास करीत आहेत.

चार पोलीस ठाणे आणि पोलीस उपअधीक्षकांचे कार्यालय असून देखील संगमनेर तालुक्यातील चोऱ्या, घरफोड्या, अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर पोलिसांना नियंत्रण मिळवण्यात अपयश येत आहे. संगमनेर उपविभागासाठी पूर्ण वेळ पोलीस उपअधीक्षक यांची नेमणूक नाही. सध्या शिर्डी येथील पोलीस उपअधीक्षक हे संगमनेर उपविभागाचे काम पाहत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!