आश्वी आणि दाढ पंचक्रोशीत वाळू तस्करांचा धुमाकूळ ; शांतता भंग !

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील आश्वी सह राहता तालुक्यातील दाढ बुद्रुक व खुर्द गावांमध्ये प्रवरा नदीपात्रातुन वाळू उपशावरुन वाळू तस्कराची स्पर्धा सुरु असल्याने या तस्करांनी प्रवरा पट्टयात मोठा धुमाकूळ घातला आहे.

मागील काही दिवसापासून प्रवरा पट्टयातील प्रतापपूर, आश्वी बुद्रुक, ओझर, दाढ बुद्रुक, दाढ खुर्द या गावानमध्ये वाळू तस्करानी धुमाकूळ घातला असून आश्वी बुद्रुक व प्रतापपूर येथिल वाळु तस्करांमध्ये अंतर्गत वादातून नियमित हाणामारीच्या घटना घडत असल्याने आश्वीसह पंचक्रोशीतील गावानमध्ये शांततेचा भंग होत आहे.

अशांततेचे वातावरण निर्माण करण्याला परिसरात सुरु असलेली अवैध दारू विक्री व मटका यामुळे हातभारचं लागत असल्याचे चित्र आहे.

महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदार संघातील संगमनेर व राहता तालुक्याच्या सीमेवरील प्रतापपूर व दाढ गावाच्या हद्दीबरोबरचं आश्वी पंचक्रोशीतील उंबरी बाळापूर, आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक, ओझर बुद्रुक, ओझर खुर्द, शेडगाव, प्रतापपूर, जोर्वे व दाढ खुर्द येथिल वाळूतस्कंरानी प्रवरानदी पात्रात थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा महसूल व पोलीस प्रशासनाच्या आदृष्य आशिर्वादाने सुरु आहे.

त्यामुळे स्थानिक पुढारी व महसूल कर्मचाऱ्यांशी संगनमताने अव्वाच्या सव्वा किमंतीत चोरुन वाळू पुरवठा करुन वाळू तस्कंर लूट करत आहेत. शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडत असून हे तस्कर नागरीकानवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याने पंचक्रोशीतील स्थानिक नागरीक संताप व्यक्त करत आहेत.

पोलीस व महसूल प्रशासन लहान – लहान तस्करावर कारवाई करताना दिसत असले तरी वाळू तस्करीतून पैसा, या पैशातून राजकारण व दादागिरी करणाऱ्या मोठ्या वाळूतस्करावर कारवाई कधी होणार याकडे नागरीकाचे लक्ष लागले आहे. कारण मागील काही दिवसांपासून वाळू तस्करांच्या दोन गटात हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. मात्र याकडे पोलीस प्रशासन सोयीस्कर, दुर्लक्ष करीत आहे. संगमनेरच्या महसूल प्रशासनाने प्रवरानदी पात्रालगत असलेल्या या गावांमध्ये गस्त वाढवून वाळू तस्कंराच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.

दरम्यान महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू बाबतचे धोरण लवकर जाहीर करुन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिक नागरीकातून जोर धरु लागली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!