संगमनेरात घरफोडी ; चोरट्यांची दहशत !
प्रतिनिधी —
संगमनेर शहर हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून शहरासह उपनगरात चोरट्यांची दहशत पसरली आहे. गोल्डन सिटी या ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पळवली आहे. ही घटना पहाटे घडली. या उपनगरात दोन ठिकाणी घरफोडी करण्याचा करण्यात आली. मात्र एकाच ठिकाणी छोट्यांच्या हाती ऐवज लागला.

तर हॉटेल स्वदेशच्या मागे असणाऱ्या कॉलनीमध्ये पाच सहा दरोडेखोरांनी हातात टामी आणि काठया घेऊन धुमाकूळ घातला. त्यांना पाहिलेल्या एका तरुणावर हे सगळे धावून गेले. त्या तरुणाने आरड ओरड केल्यानंतर हे चोरटे पळून गेले.

उपनगरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या असून त्याचे फुटेज सोशल मीडिया वरून व्हायरल झाले आहे.

संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरट्यांची दहशत पसरली आहे. दरोडेखोरी, घरफोडी, भुरट्या चोऱ्या, पाकीट मारी याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. असे असतानाही पोलिसांकडून कुठल्याही प्रकारे तपासात यश मिळत नसल्याचे आढळून आले आहे. हे सर्व घडत असताना चोरट्यांचा धुमाकूळ आणि घरफोडी मात्र थांबलेली नाही.

गोल्डन सिटी मध्ये एका बंद घरातून चोरट्यांनी सव्वा तोळे वाजण्याचे सोन्याचे दागिने आणि आठ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. निलेश बादशहा राहणे (रा. रायतेवाडी, ता. संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. तर दुसऱ्या एका घरात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला मात्र त्यांना तिथे काही आढळून आले नसल्याचे पोलीस सांगतात.
गोल्डनसिटी, अरगडे मळा, गुंजाळवाडी शिवार, हॉटेल स्वदेश मागील रहिवासी बंगले या परिसरात चोरट्यांचा नेहमीच धुमाकूळ सुरू असतो.

