संगमनेरात गौण खनिजाची चोरी – तस्करी सुरूच !

दगडाने भरलेला टेम्पो चालकाने तलाठ्या देखत पळवून नेला…

प्रतिनिधी —

 

महसूल विभागाच्या कडक कारवाईमुळे गौण खनिजावर अवलंबून असणारे बांधकाम व्यवसाय ठप्प झालेले असताना संगमनेर मधे या कामावर अवलंबून असणाऱ्या बिल्डर्स, कामगार, मजुरांचा आक्रोश मोर्चा एकीकडे निघालेला असतानाच दुसरीकडे मात्र गौण खनिजाची चोरी करून १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन गौण खनिज तस्कर पळून गेल्याची घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे. त्यामुळे तालुक्यात गौण खनिजाची चोरी सुरूच असल्याचे उघड झाले आहे.

महसूल विभागाने गौण खनिज आणि वाळू तस्करीवर निर्बंध लादले आहेत. सगळीकडे वाळू तस्करीला आळा बसलेला आहे. गौण खनिज चोरणारे, गौण खनिजाची रॉयल्टी बुडवणारे अशा सर्वच दगड खाण वाले आणि स्टोन क्रशर वाल्यांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

याचा निषेध म्हणून संगमनेरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा काढण्याच्या पूर्वसंध्येला संगमनेर तालुक्यातच एका गौण खनिज तस्कराने टेम्पो भरून दगड चोरून नेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे तलाठ्याने हा टेम्पो पकडून तहसील कार्यालयात घेऊन जाण्यास चालकाला सांगितले असताना तो टेम्पो आणि दगड या गौण खनिजासह सह पळून गेला आहे.

संग्राम बाळासाहेब देशमुख (तलाठी संगमनेर तहसील कार्यालय) यांनी यासंदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी टेम्पो गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकारामुळे संगमनेर तालुक्यात गौण खनिजाची चोरी सुरूच असल्याचे उघड झाले आहे.

शनिवार दिनांक ६ जानेवारी रोजी पिंपरणे येथे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तलाठी देशमुख यांना गौण खनिज दगडाची चोरी करून एक टेम्पो जात असल्याचा आढळून आला. हा टेम्पो क्रमांक एम एच २० बि.टी. ३८७६ हा तलाठी यांनी थांबवून चालकाला सदर टेम्पो तहसील कार्यालयात घेऊन चला असे सांगितले.

मात्र तहसील कार्यालयाकडे जातो असे सांगून रस्त्यावरून जात असताना चालकाने सदर टेम्पो दगड खनिजासह पळवून नेला असल्याची फिर्याद तलाठी देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून टेम्पो सह दगड गौण खनिज असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे गुन्ह्यात नोंदविले आहे.

या टेम्पो चालकाचे नाव आणि पत्ता माहीत नाही. मात्र या टेम्पोचा मालक अण्णासाहेब कुसळकर (राहणार निमज, तालुका संगमनेर) असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बातमीतील छायाचित्र संग्रहित…

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!