ट्रकमधून अडीचशे लिटर डिझेल चोरले
प्रतिनिधी —
चोऱ्या, घरफोडी, दरोडे आणि खुनापाठोपाठ आता संगमनेरमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमधील डिझेलची देखील चोरी सुरू झाली आहे. नासिक-पुणे महामार्गावर सायखिंडी शिवारात उभ्या असलेल्या एका ट्रकच्या डिझेल टाकीतून अडीचशे लिटर डिझेल अज्ञात चोरट्याने काढून नेण्याचा प्रकार समोर आला आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात अमोल भाऊसाहेब गायकवाड राहणार सायखिंडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विविध गुन्ह्यांचा तपास लावण्यात अपयशी ठरलेल्या शहर पोलिसांना नव्या वर्षात आता वाहनांतील डिझेल चोरांचा देखील शोध घ्यावा लागणार आहे.

गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास नासिक-पुणे महामार्गावरील हॉटेल जय मल्हार समोर अशोक लेलँड कंपनीची १४ टायर ट्रक लावली असता अज्ञात चोरट्याने ट्रकच्या डिझेल टाकीचे कुलूप तोडून त्यातील सुमारे २३ हजार दोनशे ५० रुपयांचे २५० लिटर डिझेल चोरून नेले. अधिक तपास पोलीस नाईक आशिष आरवडे करत आहेत.

