सावित्रीबाई फुले यांचे विचार हाच आपला वारसा —  डॉ. अमित शिंदे

समाजवादी जन परिषद आणि अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने सावित्रीबाईं फुले आणि महर्षी विठल रामजी शिंदे यांना अभिवादन !

प्रतिनिधी —

समाजवादी जन परिषद आणि अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने सावित्रीबाईं फुले आणि महर्षी विठल रामजी शिंदे यांना अभिवादन सभा संगमनेर व्यापारी असोसिएशन हॉल येथे घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या तालुका अध्यक्ष भारती ताई धरत या होत्या. सभेचे प्रास्ताविक समाजवादी जन परिषदेचे तालुका अध्यक्ष शांताराम गोसावी यानी केले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. अमित शिंदे यांनी सावित्रीबाई आणि महर्षी शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. आपल्या भाषणात त्यांनी सावित्रीबाई आणि महर्षी शिंदे यांच्या विचारांचा वारसा हाच आपला खरा वारसा आहे. अशी मांडणी केली.

दयानंदा जाधव ह्यांनी सावित्रीबाई फुलेंची ओवी म्हणून उपस्थितांच्या वतीने सावित्रीबाईना अभिवादन केले. समाजवादी जन परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. निशा शिवूरकर यांनी देशातील सध्याच्या परिस्थीत महर्षी शिंदे आणि सावित्रीबाई फुलेंच्या समतेच्या व करुणा मार्गाने जावून आपण कष्टकरी जनतेच्या चळवळी यशस्वी करूयात. आपण सगळ्या सावित्रीबाईंच्या लेकी आहोत. कोणालाही न घाबरता निर्भयपणाने आपला संघर्ष पुढे नेऊयात असे आवाहन केले.

या सभेत सावित्रीबाई व महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची, पुणे येथील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करावे, महाराष्ट्र शासनाने आंतरधर्मीय विवाह सबंधी केलेला समितीचा निर्णय रद्द करावा, संगमनेर बसस्थानकावरील शौचालयात स्त्रियांसाठी प्रत्येकी ५ रू आकारले जातात ते रद्द करावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी मिळावी, पगाराच्या निम्मी पेन्शन मिळावी, ग्रचुटी मिळावी, पोषण ट्रकर मराठीत करावे इत्यादी मागण्या व ठराव या वेळी करण्यात आले.

सभेच्या अध्यक्ष भारती धरत यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या चळवळीचा आढावा घेतला. तसेच सरकारचा खाजगीकरणाच्या धोरणाचा निषेध केला. एकजुटीने लढून आपण आपले हकक मिळवू असे सांगितले. सभेला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. सभेच्या यशस्वीते साठी ॲड. अनिल शिंदे, सुनंदा राहणे, नारंगा बाई ढोकरे, इंदुमती घुले,बाबुराव गायकवाड, मंदा ठोंबरे, सामिना शेख इत्यादींनी प्रयत्न केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!