पिंपरणे येथे छात्रभारती संघटनेचा सावित्रीबाई फुले जयंती उत्सव !
प्रतिनिधी —
छात्रभारती विद्यार्थी संघटना पिंपरणे ग्रामपंचायत, गगनगिरी महाराज विद्यालय यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.

गावामध्ये ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांची मोठी रॅली काढण्यात आली. शाळेमध्ये कार्यक्रम हा पार पडला.
सावित्रीच्या लेकी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांचा सारखा पोशाख करून हातामध्ये पाटी घेऊन तसेच विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांचा पोशाख करून मिरवणुकीत सहभाग घेतला.

या मध्ये गावातील ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, महिला , गगनगिरी विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, शाळेचे विद्यार्थी, छात्रभारती पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या घोषणा देण्यात आल्या.

