संगमनेर सुकेवाडी येथे दरोडा घालणारे दोन दरोडेखोर जेरबंद !

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या पावबाकी, सुकेवाडी, संगमनेर येथे दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांपैकी दोन सराईत आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

ही कारवाई नगर तालुक्यातील सालेवडगाव रोड चिचोंडी पाटील शिवारातील माळरानावर पथकातील कर्मचाऱ्यांनी वेशांतर करून पार पाडली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमी द्वारा माहिती मिळाली असता त्यांनी विशेष पथकाला सूचना केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक सालेवडगावरोड तालुका नगर या ठिकाणी रवाना झाले.

या पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी वेशांतर करून सालेवडगाव येथे जाऊन माळरानावर पाहणी केली असता त्यांना सहा ते सात इसम एका लिंबाच्या झाडाखाली बसलेले दिसले.

त्या लोकांना पोलिसांची चाहूल लागताच ते माळरानावर पळू लागले. पथकाने लागलीच पाठलाग करून दोनजण पकडले. त्यांच्या इतर साथीदारांना शोधण्याचा प्रयत्न केला असता डोंगरातील झाडाझुडपांचा आधार घेत इतर साथीदार पळून गेले असल्याने ते मिळून आले नाहीत.

पथकाने पकडलेल्या दोन संशयीतांपैकी एकाचे नाव रावण उर्फ जनक नादर चव्हाण (वय २३) व दुसऱ्याचे नाव दिलीप नादर चव्हाण (वय २३) दोन्ही राहणार सालेवडगावरोड, चिचोंडी पाटील, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर असे आहे.

वरील दोन्ही आरोपींकडे पोलिसी पद्धतीने चौकशी केली असता त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी गुन्हा केल्याची कबुली आरोपींकडून मिळालेली आहे.

यातील आरोपींनी पावबाकी, सुकेवाडी तालुका संगमनेर येथे घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने या दरोडेखोरांना पकडल्यामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या दरोडे, चोऱ्या, घरफोड्या याचा तपास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सदर कारवाई करताना पोलिसांच्या विशेष पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, सहाय्यक फौजदार मनोहर शेजवळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, बापूसाहेब फोलाने, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, फकीर शेख, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, पोलीस नाईक शंकर चौधरी, विशाल दळवी, संदीप दरंदले, सचिन आडबल, भीमराज खर्से, दीपक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर माने, विनोद मासाळकर, आकाश काळे, रणजीत जाधव, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे महिला पोलीस कॉन्स्टेबल सारिका दरेकर तसेच चालक हेड कॉन्स्टेबल बबन बेरड, संभाजी कोतकर, अर्जुन बडे, व भरत बुधवंत यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!