संगमनेर तालुक्यातील पठार भागात गुंडागर्दी ; रिव्हॉल्वरही निघाले !

सासामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला — तिघांना अटक !!

प्रतिनिधी —

ग्रामसभेत सार्वजनिक कामाबाबत प्रश्न विचारल्याचा राग येऊन संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील नामदेव इघे या व्यक्तीला डोक्याला रिव्हॉल्वर लावून आणि तोंडात औषध टाकून दोन गाड्यांतून आलेल्या गावातील गुंडांनी प्राणघातक हल्ला करीत जबर मारहाण केली. यात त्यांच्याबरोबर असलेला एक मित्र पळून गेला. घारगाव पोलिसांनी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून इतर १० ते १५ जणांना आरोपी केले आहे यातील तिघांना अटक करण्यात आलेली आहे. ही घटना साकुर कडे जाताना हिवरगाव पठार घाटात शुक्रवारी रात्री घडली आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यातील पठार भागात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण आहे.

बाजीराव खेमनर, संतोष खेमनर आणि सुधीर फटांगरे या तिघांना अटक करण्यात आलेली आहे.

सुजित अशोक खेमनर, अनमोल शंकर खेमनर, आबा वाकचौरे, बाजीराव सतु खेमनर, संतोष धोंडीभाऊ खेमनर, उमेश अशोक गाडेकर, गणपत बाळासाहेब पवार, किशोर  बापु गाडेकर, रफिक सिकंदर चौगुले, भगवान सुभाष शेंडगे, लखन सुभाष शेंडगे, बालम सुलेमान पटेल, दत्तात्रय सुभाष रेणुकादास, फिरोज सरदार पटेल, सुधिर सयाजी फटांगरे कल्पेश गडगे पुर्ण नांव माहित नाही, सर्व रा. साकुर व इतर 10 ते 15 अनोळखी आरोपी प्रसार आहेत.

या घटनेने संगमनेर तालुक्यातील पठार भागात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण आहे.

साकूर ग्रामसचिवालयात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेस जोगेपठार येथील ग्रामस्थांना पाणी पुरवठा होत नसल्याबाबत ग्रामसेवकास इघे यांनी प्रश्न केला असता शंकर हनुमंत खेमनर म्हणाले, तुझा येथे बोलण्याचा काहीएक संबंध नाही तू खाली बस. त्यावर त्यांना समजावून सांगितले की, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. माझा वैयक्तिक प्रश्न नाही तो जनतेचा हक्क आहे.

त्याचा राग येऊन शंकर खेमनर, इंद्रजीत खेमनर, अनमोल खेमनर, हर्षद खेमनर, रफीक चौगुले, आबा वाकचौरे, गणपत पवार आणि ग्रामसेवक नागेश पाबळे यांनी शिवीगाळ, दमदाटी करून करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तू जर आमच्याविरुध्द आवाज उठवला तर तुला कायमचा संपवून टाकीन. तू जर आमच्याविरुध्द पोलिसांत तक्रार दिली तर तुझ्यावर आम्ही ग्रामसेवकाकरवी गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. याबाबत सुनील इघे यांनी घारगाव पोलिसांत फिर्याद दिली घारगाव पोलिसांनी या संदर्भात गुन्हा देखील दाखल केला होता.

त्यानंतर रात्री इघे व त्यांचे दोन मित्र साकुर कडे परतत असताना हिवरगाव पठार घाटात आले असता अचानक दोन गाड्यांमधील 20-25 जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. इघे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या एका मित्राचा मोबाइल या टोळक्याने हिसकावून घेतला व त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या गडबडीत त्यांच्याबरोबर असलेला दुसरा मित्र सटकला व तो घटनास्थळावरून गायब झाला.

दूर गेल्यानंतर त्याने संबंधितांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच मारहाण करणारे पसार झाले. पोलिसांनी जखमी इघे यांना संगमनेर येथे उपचारासाठी आणले असून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुनील नामदेव इघे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!