किशोर कालडा यांना स्वामी विवेकानंद इंडियन आयकॉन अवॉर्ड !
प्रतिनिधी —
संगमनेर येथील माजी नगरसेवक किशोर कालडा यांना स्वामी विवेकानंद इंडियन आयकॉन अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला आहे. एनडीसीए दिल्ली या संस्थेतर्फे त्यांना हा सन्मान करण्यात आला आहे.

सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या किशोर कालडा यांना यापूर्वी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेले आहेत. राज्य आणि देश पातळीवर त्यांनी केलेल्या कार्याची दखल राष्ट्रीय संस्थेने घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.

राजकीय, सामाजिक, खेळ, पत्रकारिता अशा क्षेत्रांमध्ये त्यांच कार्य सर्वश्रुत आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांचे पन्नास वर्षापासून योगदान आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्लीपासून विदेशापर्यंत त्यांनी काम केलेले आहे.

यापूर्वीसुद्धा त्याना जीवनगौरव पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आणि फेलोशिप, आदर्श पत्रकार, आदर्श नगरसेवक म्हणून अनेक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. त्यांनी पन्नास वर्ष समाजसेवा केलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात काम करताना मिस्टर क्लीन म्हणून त्यांची ओळख आहे. या पुरस्कारामुळे त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.

