मैत्रिणीकडे गेलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळविले !
शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
प्रतिनिधी —
मैत्रिणीकडे जाते असे सांगून घराबाहेर गेलेल्या मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरा नजीकच्या राजापूर येथे ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

नोकरी निमित्ताने नासिक येथे राहत असलेल्या व्यक्तीचे राजापूर येथील कुटुंबीय घोटी येथे नातेवाईकांकडे गेले होते. यावेळी राजापूर येथील घरी पुतण्या आणि पुतणी होते. १४ डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराची पुतणी मैत्रिणीकडे जाते असे तिच्या भावाला सांगून घराबाहेर गेली.

मात्र सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने तिचा आजूबाजूला शोध घेतला असता ती आढळून आली नाही. त्यामुळे नातेवाईकांकडे देखील शोध घेतला मात्र त्यांना देखील काही माहिती नसल्याचे पुतण्याने कळविल्याने नाशिक येथील राजापूर येथील घरी आले.

बेपत्ता झालेला आपल्या पुतणीचा परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती कोठेही आढळून आली नाही त्यामुळे तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले असल्याची तक्रार शहर पोलिसांकडे करण्यात आली आहे.

सोळा वर्ष आठ महिने वयाची मुलगी बेपत्ता झाल्या संदर्भात तसेच तिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याबाबत शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ नुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहेत.

