पुणे नाशिक महामार्गावर माहुली घाटात रस्त्याच्या कडेला डेड बॉडी सापडली !
प्रतिनिधी —
पुणे नाशिक महामार्गावर माहुली शिवारात माहुली घाटात अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले आहे. पोलीस पाटील यांनी यासंदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात खबर दिली असून घटनेची नोंद करण्यात आली आहे.

माहुली शिवारात नवीन घाटात पुणे नाशीक रोडच्या कडेला एक इसम पडलेला असून तो मयत झालेला असावा अशी खबर मिळाल्यावर पोलीस पाटील त्या ठिकाणी गेले. सदर ठिकाणी जाऊन पाहीले असता सदर इसम एका अंगावर पडलेला होता. त्यास सरळ करुन पाहीले असता तो गावातील अगर ओळखीचा दिसून आला नाही.

मयताच्या अंगावर मळकट व कपडे व राखाडी रंगाचा स्वेटर घातलेला होता. सदर ठिकाणी गावातील व रस्त्याने येणारे जाणारे लोक जमा झाले. पण त्यांनी कोणीही त्यास ओळखले नाही. तो कशामुळे मयत झाला आहे. हे सांगता येणार नाही. अशी खबर पोलीस पाटील राजेंद्र संपत सुर्यवंशी यांनी दिल्याने पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

