संगमनेर तालुक्यातील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा !
दोन पीडित मुलींची सुटका व एक महिला आरोपी ताब्यात
प्रतिनिधी —
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी संगमनेर तालुक्यातील पठार भागात घारगाव परिसरातील घाटात पोखरी शिवारात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय रॅकेटचा भांडाफोड केला असून एका महिलेला अटक करण्यात आलेली आहे.

घारगाव परिसरातील घाटात पोखरी शिवारात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे अशी गुप्त बातमी मिळाल्यानंतर नाशिक पुणे महामार्ग परिसरातील घाटात पोखरी शिवारात बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकून दोन परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे.
पठार भागातील पोखरी शिवारात तळेवाडी रोडला हॉटेल साईप्रसाद च्या पाठीमागे डोंगराच्या कडेला एका शेतात पत्र्याच्या शेड मधील खोलीत हा अवैध कुंटणखाना चालू होता.

तसेच एका महिला आरोपी विरुद्ध घारगाव पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. 406/2022 कलम महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे टाकसेवाडी, पोखरी बाळेश्वर परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.

