पिस्तूल बाळगणाऱ्या संगमनेर तालुक्यातील तिघांना पकडले !

८ लाख २० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी —

मेडइन युएसए असा शिक्का असलेली पिस्तूल आणि काडतुसे घेऊन फिरणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडल्याची घटना घडली असून हे तिघेजण संगमनेर तालुक्यातील आहेत.

इरफान युनुस शेख (वय- २५ वर्षे, धंदा-व्यापार, रा. कुरण रोड, ता. संगमनेर जि. अहमनगर), मुसा हारुण शेख (वय- २८ वर्षे, व्यवसाय शेती, रा. कुरण रोड, ता. संगमनेर जि. अहमनगर), समित लाजरस खरात (वय ३० वर्षे, व्यवसाय चालक, रा. कुरण रोड, महादेव वस्ती ता. संगमनेर जि. अहमनगर) अशी पकडलेल्या तिघांची नावे आहेत.

पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलिसांनी या तिघांना पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र दुंदु सातवी यांनी फिर्याद दिली आहे.

उधवा दुरक्षेत्र येथे डयुटीवर असतांना आगामी गुजरात निवडणुकीचे अनुषंगाने उधवा-कोदाड रोडवर दळवी पाडा फाटा या ठिकाणी नाकाबंदी करीत असताना पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास उधवा कडुन कोदाड कडे जाणारी एक पिकअप गाडी क्र. एम.एच ४१ जी ३२७३ ही आली. गाडी थांबवून चेक केली असता त्यात तीन व्यक्ती बसलेल्या होत्या. ते तिघेजण गुजरात कडे जाणार होते. त्यांना गाडीच्या खाली उतरवून पिकअप गाडीची कसून झडती घेतली असता एका प्लास्टीक पिशवीमध्ये एक पिस्टल (कट्टा) व दोन जिवंत राऊंड विना परवाना संगणमताने कब्जात बाळगले असतांना मिळुन आले.

MADE IN U.S.A मार्क असलेले एक पिस्टल (कट्टा) तिस पकडण्याच्या ठिकाणी दोन्ही बाहेरील बाजुला लाकडी प्लेट स्क्रू ने फिट केलेल्या असून सदरचे पिस्टल सुमारे ६ सेमी लांबीचे व सुमारे साडेचार इच रुंदीचे आहे. तसेच k.f 7.65 मार्क असलेले पिस्टल (कट्टा ) चे जिवंत दोन राऊंड मिळून आले.पिकअप गाडीसह सुमारे ८ लाख २० हजार ७०० रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

दरम्यान तीनही आरोपी संगमनेर तालुक्यातील असल्याने संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात संगमनेरच्या बजरंग दलाने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले असून सदर आरोपी हे गोवंश हत्या व गोवंश मांस तस्करी करणारे आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. याची सखोल चौकशी झाली तर संगमनेर तालुक्यातील कुरण या ठिकाणी अवैध शस्त्रे सापडण्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार अहमदनगर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने करण्यात आलेली आहे. तसे निवेदन बजरंग दलाचे नगर विभाग संयोजक सचिन कानकाटे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.

तलासरी पोलीस ठाण्यात ३८६/२०२२ भादवि कलम ३४ सह, भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे हे करत आहेत.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!