घरामागे शेतात लावली गांजाची झाडे !
नगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा
प्रतिनिधी —
एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील घराच्या मागे गांजाची झाडे लावून गांजाची शेती करण्यास सुरू केली असल्याची माहिती मिळताच नगर स्थानिक गुन्हे शाखेने छापा घालून ३६ हजार रुपये किमतीची ५५ लहान-मोठी गांजाची झाडे जप्त केली असून एकाला अटक केली आहे.
महादेव दादाबा खेडकर (वय ५५, रा.मुंगूसवाडे, ता. पाथर्डी) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मुंगूसवाडे शिवारातील हॉटेल ओमकारचे बाजुस, ता.पाथर्डी येथे महादेव खेडकर याने त्याच्या मालकीचे शेतात घराच्या मागे गांजा वनस्पीतीची झाडे लावलेली आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कटके यांनी पथकातील अधिकारी व पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक कायंदे, वाघ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुंगूसवाडे शिवारात पायी चालत गेली व हॉटेलच्या बाजूस असलेल्या शेतातील घराच्या पाठीमागे छापा घालून शेतामधून ३६ हजार रुपये किंमतीची ४ किलो ५०० ग्रॅम वजनाची गांजाची लहान मोठी ५५ हिरवी झाडे मिळून आल्याने कारवाई करुन जप्त केली.

याप्रकरणी पोलीस हवालदार सुरेश चंद्रकांत माळी, स्थानिक गुन्हे शाखा यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन पाथर्डी पोलीसांनी गु.र.नं. १९६४/२०२२ एन. डी. पी. एस. कलम २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील कायदेशिर कारवाई पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.

कारवाईच्या या पथकात स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, सहाय्यक फौजदार मनोहर शेजवळ, विष्णु घोडेचोर, पोलीस हवालदार बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, सुरेश माळी, विशाल दळवी, विनोद मासाळकर, महिला पोलीस नाईक भाग्यश्री भिटे तसेच चालक हवालदार उमाकांत गावडे व भरत बुधवंत यांनी सहभाग घेतला होता.

