आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी – चोरीचे प्रमाण वाढले !
सादतपूर शिवारात घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरले
प्रतिनिधी —
सादतपूर शिवारात घराच्या दरवाजाची कडी कोयंडा उचकटून सोन्याच्या दागिन्यांची चोरी करण्याचा प्रकार घडला असून यासंदर्भात आश्वी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दी अंतर्गत घरफोडी आणि चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे
संतोष तुकाराम मगर (रा. सादतपुर शिवार ता. संगमनेर) यांनी अश्विनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, मगर हे सादतपुर गावच्या शिवारात स्वतःच्या शेतातच बंगल्यामध्ये कुटुंबासह राहवयास आहेत. त्यांनी म्हटले आहे की, शनिवारी पहाटे मला व पत्नीला तळ मजल्यावर काही तरी वाजण्याचा आवाज आला म्हणुन मी व पत्नी अर्चना जिण्या वरुन खाली डोकावून पाहीले असता. मला खालील मजल्यावरील बेडरुम मधुन दुसऱ्या बेडरुम मध्ये जातांना दोन आज्ञात इसम दिसले.

मी लगेच गावातील इतर लोकांना फोन करुन चोर घरात घुसले असल्याचे कळविले. आमचा आवाज ऐकून चोरटे तेथुन बाहेर पळुन गेले. तेव्हा मी व पत्नी अर्चना असे खालील मजल्यावर बेडरुमची पहाणी केली असता. आम्हाला बेडरुम मधील कपाट फोडून त्यातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले. तसेच सदर कपाटाजवळच ठेवलेली माझ्या आईची लोखंडी पेटी तोडून त्यातील सामान असताव्यस्त पडलेले दिसले.

आम्ही सदर पेटीतील पैशाचा व सोन्याचे दागीने ठेवलेला डबा बघीतला असता सदरचा डबा हा पेटीजवळ पडलेला होता व त्यातील दोन तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, एक तोळा वजनाची सोन्याची चैन आणि ३० हजार रुपये रोख रक्कम असे चोरुन नेली असल्याचे आढळून आले.

तसेच मी व घरातील लोक आणि गावातील इतर लोकांनी घराची व आजुबाजूला पाहणी केली. चोर ज्या दिशेने पळाले त्या दिशेस जाऊन पाहीले असता चोर ज्या मोटारसायकलवर चोरी करण्यासाठी आले होते ती मोटारसाकल घरापासून सुमारे ५० मिटर अंतरावर शेतात टाकून पळाले होते. ती मोटर सायकल हीरो होंडा सी. डी. डिलक्स एम एच १७ डब्ल्यू ७९२३ नंबरची आहे. आश्वी पोलिसांनी मगर यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

