संगमनेरात पुन्हा एक हजार किलो गोवंश मांस पकडले !
८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी —
गोवंश हत्या आणि गोवंश मांस तस्करीसाठी कु-प्रसिद्ध असलेल्या संगमनेर शहरात पुन्हा एकदा पोलिसांनी एक हजार किलो गोवंश मांस पकडले असून सुमारे ८ लाख ५० हजार रुपये किमतीच्या गाड्यांसह मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दोन आरोपींवर या संदर्भात गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी पसार झाला आहे.

सलमान नजीर शेख (वय २०, रा. नाईकवाड पुरा, संगमनेर), बुंदी उर्फ मुदस्सर करीम कुरेशी (रा. भारत नगर, संगमनेर) हा प्रसार झाला आहे.

जोर्वे नाका परिसरात आज पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. रात्री एक वाजे नंतर महिंद्रा झायलो क्रमांक एम एच ४४ एच ०८३४ व छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच ४३ ए डी २२६२ यामध्ये जनावरांची वाहतूक करण्यासाठी जिवंत जनावरे डांबून ठेवून, तसेच कत्तल करून व मांस वाहतूक करताना मिळून आली.

त्याचप्रमाणे यावेळी पोलिसांचा छापा पडला असल्याची चाहूल लागताच बुंदी उर्फ मुदस्सर करीम कुरेशी हा त्याच्या ताब्यातील वाहन सोडून पळून गेला त्याच्या वाहनात देखील गोवंश मांस आढळून आले आहे.

पोलिसांनी तब्बल १००० किलो गोवंशमन जप्त केले असून वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या देखील ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये छोटा हत्ती गाडीमध्ये ६०० किलो गोमांस आढळून आले. तर झायलो कार मध्ये ४०० किलो गोमांस आढळून आले आहे. पोलिसांनी छोटा हत्ती तसेच महिंद्रा झायलो ही गाडी जप्त केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सचिन दत्तात्रय आडबल यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून भारतीय दंड विधान कलम २६९, ३४ व महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ (क) ९ प्रमाणे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उगले हे करत आहेत.

