काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रतिनिधी —

नगर औरंगाबाद पांढरीपुल मार्गे शेवगांवकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोसपुरी गावाच्या शिवारात ट्रक मधून जाणारा २१० गोण्या असलेला रेशनिंगचा शासकीय तांदूळाचा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने पकडला आहे. एकूण ६ लाख ७३ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन जण ताब्यात घेतले आहेत.

फारुक फकीर मंहमद शेख (वय 30 रा. खरवंडी ता. नेवासा, जि. अहमदनगर), कांतीलाल झुंबरलाल भंडारी (वय 54 वर्षे रा. खरवंडी ता. नेवासा, जि. अहमदनगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, पांढरी पुल ते शेवगांव रोडने शेवगांवकडून पांढरीपुलाकडे अशोक लेलंड ट्रक क्रमांक एम.एच. १७ बी वाय ५९६० यामधुन रेशनिंगचा तांदुळ काळ्याबाजारात विक्रीसाठी जात आहे.

 

खात्रीशिर माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस हवालदार विजयकुमार बाळासाहेब बेठेकर, बापूसाहेब रावसाहेब फोलाणे, पोलीस नाईक शंकर संपत चौधरी, लक्ष्मण चिधू खोकले, सचिन दत्तात्रेय अडबल, संतोष शंकर लोढे, जालिंदर मुरलीधर माने, चंद्रकांत कुसळकर पथकाने सदर कारवाई केली आहे.

पथकाने सदर ठिकाणी गाडी थांबवून गाडीमध्ये पाहणी केली असता ट्रकमध्ये पांढऱ्या गोण्यामध्ये तांदुळ असल्याचे आढळून आले.

सदर तांदुळाच्या बिलाबाबत विचारपुस करता आरोपींनी उडवा उडवीची उत्तरे दिली. कांतीलाल भंडारी यांना विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी सांगितले की, मी ट्रकचा मालक असून ट्रकमध्ये असलेल्या तांदळाच्या गोण्या मुकेश बोरा (रा. ता. शेवगाव) यांच्या दुकानातून भरलेला असून तो रेशनचा शासकिय स्वस्त धान्य वितरण योजनेतील तांदुळ आहे. दुसऱ्या गोण्यांमध्ये भरुण विक्रीसाठी घेऊन चाललो आहे.

सदर तांदळाचे कोणत्याही प्रकारची बीले आढळुन आली नाहीत. शासकिय स्वस्त धान्य वितरण योजनातील तांदुळ मिळुन आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी जागीच पंचनामा करून ताब्यात घेतला. तसेच ट्रक चालक व मालक यांनाही ताब्यात घेतले आहे.

जिवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ भादवि कलम ३४ प्रमाणे कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांना सदर घटनेची माहिती देण्यात आली आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!