गावठी हातभट्टी अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा !
प्रतिनिधी —
राहुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध पद्धतीने गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्यांवर छापे टाकून गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली असून सुमारे ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दोन आरोपींमध्ये एक आरोपी महिला आहे.नराजू भगवान शिंदे (रा.डिग्रस तालुका राहुरी) यास अटक करण्यात आली आहे.
पोलीस अंमलदार सहायक फौजदार मनोहर शेजवळ, विष्णु घोडेचोर, बाळासाहेब मुळीक, हवालदार संदीप घोडके, पोलीस नाईक शंकर चौधरी, महिला पोलीस नाईक भाग्यश्री भिटे, पोलीस कॉन्स्टेबल रोहित येमुल, सागर ससाणे व उमाकांत गावडे या पथकाने राहुरी पोलीस स्टेशन हद्यीमध्ये ही कारवाई केली.

