नगर जिल्ह्यात पुन्हा गावठी कट्टा आणि काडतुस पकडले !
प्रतिनिधी —
नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात नुकतेच गावठी रिवाल्वर, गावठी कट्टे आणि काडतुस अशी शस्त्रे नगरच्या गुन्हे शाखेने पकडले असतानाच आज पुन्हा पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे पोलिसांनी एक गावठी कट्टा व काडतुस बाळगणारा इसम पकडला असून आरोपीला अटक केली आहे.
शेरखान मुबारक पठाण (वय ३५ राहणार करंजी, तालुका पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गावठी कट्टा व जिवंत काडतुस जवळ बाळगणारा इसम पाथर्डी तालुक्यातील करंजी गांवातील बस स्टॅण्ड परिसरात येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.

आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, सहाय्यक फौजदार मनोहर शेजवळ, हवालदार सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, भिमराज खर्से, पोलीस शिपाई विनोद मासाळकर, संभाजी कोतकर व अर्जुन बडे अशांनी मिळून मिळालेल्या खबरिच्या ठिकाणी पाथर्डी तालुक्याती करंजी गांवातील बस स्टॅण्ड, येथे जावून सापळा लावुन थांबलेले असतांना थोड्याच वेळात एक इसम संशयीतरित्या फिरतांना दिसला.

पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयीतास ताब्यात घेतले. शेरखान मुबारक पठाण असे आपले नाव असल्याचे त्याने सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण 25,300/- रु.किं.चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल विनोद शिवाजी मासाळकर यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

