संगमनेर खुर्द महादेव मंदिराजवळून दिवसाढवळ्या वाळू तस्करी !
प्रतिनिधी —
वाळू तस्करी विरुद्ध कडक अंमलबजावणी सुरू असली तरी संगमनेर शहरातील प्रवरा नदी पात्रात संगमनेर खुर्द जवळच्या महादेव मंदिराजवळून दिवसाढवळ्या बैलगाडी आणि रिक्षांमधून चोरटी वाळू वाहतूक होत आहे.

संगमनेर खुर्द च्या पूर्व बाजूला प्रवरानदी काठावर अमॄतेश्वर महादेव मंदिरा लगत वाळू चोरानी वाळू उपसा केल्याने या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे मंदिराला व आजूबाजूच्या घाटाला धोका निर्माण झाल्या असल्याचे येथे नागरिक सांगतात.

तसेच मंदिर परिसरात शहरातील सांडपाणी असल्यामुळे दुर्गंधी सुटलेले आहे भाविकांना याचा त्रास होतो महसूल विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

पहाटे पासून सायंकाळ पर्यंत रिक्षा व टायरच्या बैलगाड्या नदीपात्रात राजरोस वाळू चोरी करून वाहतूक करताना दिसतात. सर्वसामान्य नागरिकांनी या चोरांना हटकले तर त्यांना दादागिरी केली जाते.

