सख्ख्या बहिणींची एकाच सासरच्या मंडळींच्याविरुद्ध तक्रार !

सासू सासरे पती सह दिरावर सारखेच दोन गुन्हे दाखल

प्रतिनिधी —

सख्ख्या बहिणी असलेल्या आणि त्याचबरोबर योगायोगाने दोघीही जावा जावा असलेल्या महिलांनी सासरच्या मंडळींच्या विरोधात छळाची, मारहाणीची आणि पैशाच्या मागणीची फिर्याद दिल्याने कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्याची घटना अकोले तालुक्यात घडली आहे.

पोलिसांनी या दोन्ही महिलांच्या सासरकडील मंडळींच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून कारवाई सुरू केली आहे. सासरच्या मंडळी विरोधात फिर्याद देणाऱ्या या महिला सख्या बहिणी आहेत आणि सख्या जावा देखील आहेत.

कीर्ती मनोज पाचोरे (अयोध्या सोसायटी, पाथर्डी फाटा, नाशिक) व काजल पंकज पाचोरे (खोडियार सोसायटी, कोणार्क नगर, आडगाव, नाशिक) असे सासरच्या मंडळींविरुद्ध फिर्याद देणाऱ्या सख्ख्या बहिणी आणि जावांची नावे आहेत.

दोघींनीही सासरच्या मंडळींनी नांदत असताना शारीरिक व मानसिक त्रास देऊन, मारहाण करून तसेच पैसे मागून त्रास दिला असल्याच्या फिर्यादी दिल्या आहेत. यामध्ये पती, सासू, सासरे, दीर यांना आरोपी करण्यात आले असून कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा अकोले पोलिसांनी दाखल केला आहे.

कीर्ती यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, सासरी नांदत असताना पती मनोज आबा पाचोरे, सासरे आबा रामा पाचोरे, सासु विजया आबा पाचोरे व दिर पंकज आबा पाचोरे यांनी वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास दिला.

तसेच माहेरुन ५ लाख रुपये आणावे म्हणूनही त्रास दिला. त्यांनी वडिलांकडुन थोडेथोडे करुन ५ लाख रुपये दिले. तरीही त्रास देवून, मारहाण करुन घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तर काजल पंकज पाचोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, त्या सासरी नांदत असताना पती पंकज आबा पाचोरे, सासरे आबा रामा पाचोरे, सासु विजया आबा पाचोरे, भाया मनोज आबा पाचोरे यांनी मानसिक, शारीरिक त्रास देवून, छळ करुन, शिवीगाळ दमदाटी करुन घरातून हाकलून दिले.

या फिर्यादीवरुन अकोले पोलिसांत दोन सारखे गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आहेर करत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!