अमृतवाहिनी पॉलिटेक्नीकला एनबीएचे मानांकन

प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तीमत्वास परिपूर्ण वाव देत अमृतवाहिनी पॉलिटेक्नीकने आधुनिक बदलांसह शिस्त व गुणवत्ता यांच्या बळावर राज्यात लौकिक निर्माण केला आहे. गुणवत्तेच्या विविध पुरस्करांसह नुकतेच अमृतवाहिनी पॉलिटेक्नीक मधील चार शाखांना तीन वर्षाकरीता एनबीए नवी दिल्लीचे मानांकन मिळाले असून संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असल्याची माहिती प्राचार्य प्रा.व्ही.बी.धुमाळ यांनी दिली आहे.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेने कायम गुणवत्ता जपली असून महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यपातळीवर या संस्थेचा नावलौकिक वाढला आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी ग्रामीण भागात स्थापन केलेल्या अमृतवाहिनी पॉलिटेक्नीकला एनबीएचे मानांकन मिळाले आहे. दरवर्षीचे उत्कृष्ट निकाल, शिस्त,गुणवत्ता,नैसर्गीक व स्वच्छ परिसर, विद्यार्थ्यांना परिपूर्ण सुविधा, विविध उपक्रम, सेमिनार, विद्यार्थ्यांचे सातत्याने होणारे प्लेसमेंटचे या बाबींच्या आधारावर नवी दिल्लीच्या उच्चस्तरीय समितीने कॉम्प्युटर टेक्नोलॉजी, इन्फरमेशन टेक्नोलॉजी, मेकॅनिकल  इंजिनिअरींग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग या चार विभागांना तीन वर्षाकरिता हे एनबीएने मानांकन दिले आहे. अशा प्रकारचे मानांकन मिळविणारे उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील हे एकमेव पॉलिटेक्नीक ठरले आहे.

या मानांकनासाठी संस्थेच्या वतीने प्राचार्य व्ही.बी.धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य व कॉम्प्युटर टेक्नोलॉजी विभागप्रमुख प्रा.जी.बी.काळे यांनी मुख्य समन्वयक जबाबदारी सांभाळली तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींगचे विभागप्रमुख प्रा.बी.एल.कुलकर्णी, मेकॅनिकल  इंजिनिअरींगचे विभागप्रमुख प्रा.मिलींद इंगोले, आय.टी विभागप्रमुख प्रा.निलीमा चौधरी तसेच शैलेजा पवार, गणेश घुगे, वाय.व्ही.बोऱ्हाडे, स्वरनिता काळे, एस.एस.गंधे, योगेश लांडे व पी.बी.शिंदे यांनी वरिल विभागांचे एनबीए कॉडनेटरची जबाबदारी यशस्वी पार पाडली. याकामी या विभागातील इतर शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचाऱ्यांनी ही विशेष परिश्रम घेतले.

एनबीएचे हे मानांकन मिळाल्याबद्दल प्राचार्य,शिक्षक,कर्मचारी या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, विश्वस्त शरयू देशमुख, ॲड.आर.बी. सोनवणे, बाजीराव खेमनर, लक्ष्मण कुटे, इंद्रजित थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे  यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!