राज्य व देश कोरोनामुक्तीसह नवीन वर्षांत प्रत्येकाची संकल्पपुर्ती व्हावी- महसूल मंत्री
मागील दोन वर्षात जगावर कोरोनाचे संकट आले. या सर्व काळात आपण सर्वांनी खबरदारी घेतली. नव्याने तिसरी लाट व ओमायक्रॉनचा धोका वाढतो आहे. हा कोरोना पुर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे तसेव गर्दी न करता मास्कसह कोविड नियमांचे पालन करुन महाराष्ट्र व देश कोरोनामुक्त करावा. येणार्या नवीन 2022 या वर्षांत प्रत्येकाला पुन्हा नव्याने पुर्वीसारखे कोरोना नसलेले आनंदाचे दिवस येवोत. या 2022 वर्षात संकल्पपुर्ती होऊन प्रत्येकास हे नवीन वर्षे आरोग्यदायी, आनंदाचे व यशस्वी जावो अशा शुभेच्छा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जनतेला दिल्या आहेत. नवीन वर्षांच्या शुभेच्छा देतांना थोरात म्हणाले की,भूतकाळ हा प्रत्येकाचा मार्गदर्शक असून भविष्यांची वाटचाल ही त्यावर ठरते. कोरोना मुक्तीसह नववर्षांत प्रत्येकाने एक चांगला संकल्प करुन सामाजिक बांधलकी ठेवून राष्ट्रहितासाठी कार्य करावे. 21व्या शतकातील समृध्द भारत देशाच्या निर्मितीत प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन ही त्यांनी केले .
नवीन वर्ष प्रत्येकास आरोग्यदायी जावे – आमदार डॉ. सुधीर तांबे
धावपळीच्या जीवनात मानसाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून चांगले आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. कोरोनाच्या संकटातून संपुर्ण राज्य व देश बाहेर पडून 2022 या नव्या वर्षात प्रत्येकाच्या हातून नवीन चांगले काहीतरी घडावे. राज्याच्या व देशाच्या विकासासाठी समतेचा विचार घेवून सर्वांनी काम करावे. 2021 हे चांगल्या वाईट अनुभवांसाठी मार्गदर्शक ठरण्याबरोबर येणार्या नवीन 2022 हे वर्षात प्रत्येकाची संकल्पपुर्ती होऊन प्रत्येकास हे नवीन वर्षे आरोग्यदायी, आनंदाचे व यशस्वी जावो अशा शुभेच्छा नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिल्या आहेत.
