देशी-विदेशी दारू विक्रेत्यांवर एलसीबीचे छापे…

पाच आरोपींविरुद्ध कारवाई

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी-विदेशी दारू विक्रेत्यांविरुद्ध छापेमारी केली. दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत चार ठिकाणी छापे टाकून पाच आरोपींविरुद्ध चार गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत एकूण १३ हजार ५६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार सुनिल पवार, निळकंठ कारखेले, अभिजीत अरकल, भगवान सानप, बाळासाहेब गुंजाळ आणि जालींदर साखरे यांचे पथक तयार केले होते. पथकाने जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची माहिती घेऊन शेवगाव परिसरात ही कारवाई केली.

कारवाईमध्ये शेवगाव गुरनं. ७५२/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत शिवनाथ रामदास गुंजाळ (वय ३२, रा. दहिगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ८,०९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुरनं. ७५३/२०२६ अंतर्गत रणजीत भाऊराव मांढरे (वय ३५, रा. दहिगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) आणि जनाबाई अशोक करंजे (रा. रांजणी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये १,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जनाबाई करंजे ही फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

गुरनं. ७५४/२०२६ अंतर्गत दगडू रोबन ससाणे (वय ४२, रा. दहिगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून २,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुरनं. ७५५/२०२६ अंतर्गत शामराव गंगा शिंदे (वय ६०, रा. भायेगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!