संगमनेरमध्ये भरदिवसा घरफोडी ; ९ लाख २ हजारांचा ऐवज लंपास

प्रतिनिधी –

संगमनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकेवाडी येथील अग्नेश्वर मळा परिसरात चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ९ लाख २ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विठ्ठल भानुदास शिंदे (वय ५३, व्यवसाय शेती, रा. अग्नेश्वर मळा, सुकेवाडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांच्या राहत्या घरात ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० ते ४ वाजेदरम्यान संबंधित व्यक्तीने प्रवेश केला.

चोरट्याने घरातील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ९,०२,००० रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीच्या संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरफोडी करून चोरून नेला.

या घटनेप्रकरणी फिर्यादी विठ्ठल भानुदास शिंदे यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३०(२), ३३१(३) अन्वये दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात शिवानंद सोन्याबापू शिंदे (वय २८, रा. अग्नेश्वर मळा, सुकेवाडी, ता. संगमनेर) याचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत, संगमनेर शहर पोलीस ठाणे करीत आहेत. 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!