संगमनेर, श्रीगोंदा, कर्जतमध्ये अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेची कारवाई ; ७ गुन्हे दाखल

संगमनेर | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत संगमनेर, श्रीगोंदा आणि कर्जत पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ७ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३ लाख ४३ हजार २८० रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी ६ व ७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवैध व्यवसायांची माहिती मिळवून छापेमारी केली.

कारवाईदरम्यान संगमनेर शहरात दोन गोमांस प्रकरणांमध्ये १ लाख ७७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल, कर्जत येथे मावा विक्रीप्रकरणी १ लाख १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल, तर श्रीगोंदा येथे तीन जुगार प्रकरणांमध्ये १२ हजार ७०० रुपये आणि एका दारू प्रकरणात ३३ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाईचा तपशील :

– संगमनेर शहर – २ गुन्हे (गोमांस कारवाई) : ₹१,७७,४००

– कर्जत – १ गुन्हा (मावा कारवाई) : ₹१,१९,२००

– श्रीगोंदा – ३ गुन्हे (जुगार कारवाई) : ₹१२,७००

– श्रीगोंदा – १ गुन्हा (दारू कारवाई) : ₹३३,९८०

या सर्व कारवायांमध्ये एकूण ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ₹३,४३,२८० किमतीचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!