संगमनेरमध्ये मंगळसूत्र हिसकावणारे आरोपी जाळ्यात ; गुन्ह्यातील बलेनो कार जप्त

संगमनेर, प्रतिनिधी : 

संगमनेर तालुक्यात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याचे दागिने हिसकावून नेणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली बलेनो कार जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास तुळसाबाई संपत शिरसाठ (रा. काकडवाडी, ता. संगमनेर) या बाहेरगावी जाण्यासाठी बसची वाट पाहत उभ्या असताना अज्ञात व्यक्तींनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९(६) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हर्षल राजेंद्र भांबारे (वय २१) व निलेश विलास गायकवाड (वय २७), दोघेही रा. कोऱ्हाळे, ता. राहाता यांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपींनी बलेनो कारचा वापर करून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ६ लाख रुपये किमतीची बलेनो कार (एमएच-१७-डीसी-४८६२) जप्त केली.

दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच त्यांच्या तपास पथकाने केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!