मुकुंद चिलवंत यांनी स्वीकारला जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मुकुंद चिलवंत यांनी स्वीकारला. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

यापूर्वी त्यांनी मंत्रालय, छत्रपती संभाजीनगर आणि सिंधुदुर्ग येथे विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. कार्यभार स्वीकारल्यानंतर शासनाच्या योजना व निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत वेगाने, अचूक आणि प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रसारमाध्यमांशी सुसंवाद राखून माहिती विभागाची विश्वासार्हता अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी मावळते माहिती अधिकारी अमोल महाजन यांनी चिलवंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांचे स्वागत करून नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी लिपिक आयुष बाळदे, तुषार पाटील वाहन चालक प्रवीण मुठे आदी उपस्थित होते.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!