खड्डे – चिखल आणि पाण्याचे डबके ; ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय–एकता चौक मार्गाची दुरवस्था
संगमनेर | प्रतिनिधी
ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय ते एकता चौक, घुलेवाडी या महत्त्वाच्या मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. मोठमोठे खड्डे आणि त्यामध्ये साचलेले पाणी यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.
नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या या रस्त्यावर दिवसभर विद्यार्थी, दुचाकी व चारचाकी वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक दुचाकीस्वार घसरल्याच्या घटनाही स्थानिकांनी सांगितल्या आहेत.

चिखलामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा दुरुस्तीची मागणी करूनही अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवून योग्य जलनिस्सारण व्यवस्था करावी तसेच या मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी डॉ.राहुल हांडे, डॉ.अशोक लिंबेकर, डॉ. मारुती कुसमुडे, प्रा.शरद सावंत, ॲड. समीर लामखडे, ॲड.प्रज्ञा लामखडे, सुशांत सातपुते, महेंद्र पानसरे, सुरेश पानसरे, आनंदा पानसरे, रामनाथ पानसरे, तानाजी पानसरे, धनुष पानसरे, प्रा.सुभाष थिटमे, संजय दिघे, रवींद्र डोंगरे, सचिन फटांगरे, प्रा. सुनील मंडलिक, प्रा.अशोक निकाळे, विजय लावरे, रवींद्र सातपुते, संजय सातपुते, राहुल सातपुते, अजय राऊत, प्रा.नितीन नवले, मंगेश मेघे, शिवाजी काळे, विजय रहाणे, राजेश गोसावी, दादासाहेब जोंधळे, रमेश गुरखा, सोमनाथ शिंदे, नंदकुमार जोर्वेकर, ॲड.अशोक हजारे, ॲड.त्र्यंबक गडाख आदींनी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

