सायखिंडी जि.प. शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत

‘मॅजिक बुक’सह शैक्षणिक साहित्याचे वाटप

संगमनेर प्रतिनिधी – 

नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद शाळा, सायखिंडी येथे इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत युवा उद्योजक संदेश सुखदेव गायकवाड (ऑल इन वन सुपर मार्केट, आरोक्या दूध संकलन केंद्र) यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना ‘वेलकम गिफ्ट’ म्हणून मॅजिक बुकचे वाटप करण्यात आले.

याच उपक्रमाला हातभार लावत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कोमल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना ‘चला झटपट वाचूया’ या पुस्तकांचे वितरण केले. नवीन पुस्तके मिळाल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

या कार्यक्रमाला संदेश गायकवाड, कोमल गायकवाड, सुनील पारधी, गणेश नन्नवरे, गायत्री देवके, शाळेच्या मुख्याध्यापिका उषा जोंधळे, शिक्षिका उज्वला शिंदे आणि छाया औताडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापिका उषा जोंधळे यांनी संदेश गायकवाड यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, दरवर्षी शाळेसाठी दिल्या जाणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!