संगमनेर मध्ये वाळू तस्कर पकडले !
वाळू तस्करी जोरात सुरू असल्याचे उघड….
संगमनेर प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यात गौण खनिज तस्करीसह वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रशासन यावर किती गांभीर्याने कारवाई करती करते हा संशोधनाचा विषय असला तरी वाळू चोरी आणि तस्करी सातत्याने होत असल्याचेच उघड होत आहे. तालुक्यातील खांडगाव येथे चोरी करून वाळू वाहतूक करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखा अहिल्या नगरच्या पथकाने पकडले असून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
1) शुभम संजय जेडगुले (वय-25 वर्षे रा. वेल्हाळे ता.संगमनेर जि. अहिल्यानगर), 2) शरद कारभारी गुंजाळ (रा.खांडगाव ता.संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार विजय पावर, अमृत आढाव, योगेश कर्डिले, चालक उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शरद कारभारी गुंजाळ (रा.खांडगाव ता.संगमनेर) हा हस्तकामार्फत नाशिक रोडकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडने खांडगाव शिवारातून अवैधरित्या विनापरवाना पिकअपमध्ये वाळूची चोरुन वाहतूक करत आहे.
पथकाने तात्काळ खांडगाव पूल येथील नाशिक रोडकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडने (खांडगाव शिवार ता. संगमनेर) येथे सापळा लावून थांबले असता. एक पिकअप गाडी येतांना दिसली. पथकाने सदर पिकअप गाडी थांबवून चालकास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव 1) शुभम संजय जेडगुले (वय-25 वर्षे रा. वेल्हाळे ता.संगमनेर जि. अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले. सदर इसमास पिकअपच्या मालकाबाबत विचारपूस करता पिकअपचा मालक 2) शरद कारभारी गुंजाळ (रा.खांडगाव ता.संगमनेर) असल्याचे सांगितले.

आरोपीच्या ताब्यातून 10 हजार रु. किमंतीची 1 ब्रास वाळू व 3 लाख रुपये किमतीची एक मॅक्स कंपनीचा पिकअप असा एकुण 3,10,000/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ताब्यातील आरोपीविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 438/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे करीत आहे.

