घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 लाखाचे ‘भगवा डाळिंब’ चोरले !
संगमनेर प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केळेवाडी या गावातील एका शेतकऱ्याचे भगवा जातीच्या डाळिंबाची चोरी झाली असून 9 लाख रुपयांचे डाळिंब अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
केळेवाडी गावच्या शिवारातील कुऱ्हाडे यांच्या डाळिंबाच्या बागेतील भगवा जातीच्या डाळिंबाच्या 300 कॅरेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. डाळिंबांना सध्या भाव चांगले असल्याने तब्बल 9 लाख रुपयांचे डाळिंब चोरीस गेले आहेत.
बबन लक्ष्मण कुऱ्हाडे (राहणार केळेवाडी बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून घारगाव पोलिसांनी अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
