मधमाशीपालनातून शेतीला पूरक व्यवसायाच्या संधी ; ओझर येथे कृषिदूतांचे प्रात्यक्षिक

संगमनेर (प्रतिनिधी) –

शेतीतील परागीभवन प्रक्रिया अधिक प्रभावी करून पीक उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी मधमाश्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मधमाशीपालन हा शेतीला पूरक आणि आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत ठरू शकतो. याच उद्देशाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर येथील कृषिदूतांच्या वतीने ओझर येथे मधमाशीपालन (Apiculture) विषयावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.

या प्रात्यक्षिकादरम्यान शेतकरी व ग्रामस्थांना मधमाशीपालनाचे महत्त्व, मधमाश्यांच्या विविध प्रजाती, मधमाशी पेटीची रचना, मध संकलनाची प्रक्रिया तसेच या व्यवसायातून उपलब्ध होणाऱ्या आर्थिक संधींची सविस्तर माहिती देण्यात आली. मधमाश्या पिकांमध्ये परागीभवनाची प्रक्रिया घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे पीक उत्पादन आणि गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होते, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

मधमाशीपालन हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कसा फायदेशीर ठरू शकतो, याचे महत्त्व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून समजावून सांगण्यात आले. या उपक्रमाला शेतकरी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या मोहिमेत कृषिदूत अक्षय पालवे, पार्थ पानसरे, श्रेयस राऊत, वैभव सातपुते, ऋतुराज शिंदे, श्रेयश सोंडकर व रुद्राक्ष गाढवे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

सदर उपक्रम माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या सचिव शरयूताई देशमुख आणि संस्थेचे मुख्य प्रशासक डॉ. संदीप निंबाळकर यांचे या उपक्रमाला मोलाचे सहकार्य लाभत आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रा. जी. बी. बाचकर, शैक्षणिक प्रमुख प्रा. रवींद्र दसपुते, कार्यक्रम अधिकारी डॉ. साजन हिंगोणेकर तसेच विषय विशेषज्ञ डॉ. कोमल घोडेकर यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!