“उत्सव अकादमी” पदग्रहण सोहळा संपन्न !

संगमनेर प्रतिनिधी —

संगमनेर येथे नुकताच उत्सव कला व क्रीडा अकादमीचा पदग्रहण समारंभ पार पडला. संगमनेरच्या सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा देणाऱ्या उत्सव कला व क्रीडा अकादमीच्या पदग्रहण समारंभास पद्मश्री पुरस्कार विजेते कलाभूषण रघुवीर खेडकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी माजी आमदार सुधीर तांबे उपस्थित होते. 

 पद्मश्री रघुवीर खेडकर —

संगमनेरच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये अनेक उत्तम कलावंत, लेखक, नाटक कारांनी योगदान दिले आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संगमनेर ची एक वेगळी ओळख आहे साहित्यिकांचे, कलावंतांचे, उत्तम रसिकांचे गाव म्हणून संगमनेर प्रसिद्ध आहे संगमनेरचा प्रत्येक माणूस हा वेगळा विचार करणारा आहे आणि म्हणूनच आपल्या गावाला पद्मश्री पुरस्कार मिळाला तोही एका कलावंताला ही खूप भूषणावह गोष्टआहे. मात्र पद्मश्री किताब मिळूनही मी जमिनीवर आहे याचे श्रेय मी सर्व संगमनेरच्या नागरिकांना देतो. पुढील भविष्यकाळात सांस्कृतिक चळवळीसाठी जे योगदान माझ्याकडून देता येईल ते मी निश्चितपणे देईन. माझ्या बालपणीच्या मित्रांकडून हा सत्कार स्वीकारताना मला खूप आनंद झाला आहे असे मनोगत पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केले.

 डॉक्टर सुधीर तांबे —

संगमनेरच्या सर्व कलावंत खेळाडूंना उत्कृष्ट व्यासपीठ मिळाले पाहिजे त्यांच्या कलागुणांना चांगली संधी मिळाली पाहिजे या हेतूने स्थापन झालेल्या उत्सव व कला क्रीडा अकादमीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करत डॉक्टर तांबे यांनी सांस्कृतिक चळवळीसाठी आवश्यक असलेल्या पार्श्वभूमीचा आढावा घेतला. संगमनेरात सांस्कृतिक चळवळ उभी राहावी म्हणून नगराध्यक्ष असतानाच आपण संग्राम या संस्थेची स्थापना केली त्यातून अनेक कलावंत पुढे आले. उत्सव कला व क्रीडा अकादमीच्या माध्यमातून सर्व तरुण मुलांनी संगमनेरच्या सांस्कृतिक चळवळीत भर घातली. आपल्या देशातले अस्थिर सामाजिक आणि राजकीय वातावरण अस्वस्थ करणारे असून नव्या दमाच्या लोकांनी सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून प्रबोधन केले पाहिजे. त्यासाठी आपण पाहिजे ते योगदान द्यायला तयार आहोत आणि सर्व कलावंतांच्या व खेळाडूंच्या पाठीशी उभे आहोत अशी ग्वाही माजी आमदार सुधीरजी तांबे यांनी दिली. 

या प्रसंगी मुक्त संवाद या कार्यक्रमात प्रा. जितेंद्र पाटील, अमोल शेलकर, राजन झांबरे, राम अरगडे यांनी आपले विचार मांडले. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख, नगरसेवक शैलेश कलंत्री, योगेश(चिकू)जाजू, डॉ. दानिश खान, ॲड. नइम इनामदार, छात्रभारतीचे अनिकेत घुले, हिरालाल पगडाल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली. प्रास्ताविक प्रा. शशिकांत माघाडे यांनी केले. तर विकास भालेराव यांनी सुरेल नमन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उत्सव अकादमीच्या वतीने पद्मश्री रघुवीर खेडकर यांना सन्मान चिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला. 

 

पदग्रहण समारंभात घोषित झालेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे —

अध्यक्ष – शशिकांत माघाडे

उपाध्यक्ष – याह्याखान 

उपाध्यक्ष – ज्ञानेश्वर वर्पे

सचिव – ॲड. अमित सोनवणे

खजिनदार – गिरीष पाटणकर 

सहखजिनदार – राजेश माघाडे

कला विभाग प्रमुख – विकास भालेराव

क्रिडा विभाग प्रमुख – सुनील मंडलिक सर 

विश्वस्त – राजा वराट, भाऊसाहेब नरवडे, बाळासाहेब दासरी 

सहसचिव – सुनील एकार, सुहास लेंडे

प्रकल्प संयोजक – प्रा. जितेंद्र पाटील, प्रा. नानासाहेब गुंजाळ 

प्रसिद्धी प्रमुख – हरीश कांगणे 

महिला विभाग – रंजना पवार 

कार्यकारिणी सदस्य – सुरेंद्र गुजराथी, राम चन्ना, बाबासाहेब मोकळ, जालिंदर पानसरे, रविंद शिंदे, रवींद्र पगार, महेश घुले, विवेक तिवारी, संगीता परदेशी, संदीप देशमुख.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!