एलसीबीचा संगमनेर शहरात कत्तलखान्यावर छापा : 950 किलो गोमांस जप्त
एका आठवड्यात चौथी कारवाई !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी कडून पुन्हा छापा टाकण्यात आला असून या छाप्यात तब्बल 950 किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. एका आठवड्यातील ही चौथी कारवाई असून नगरहून एलसीबी चे पथक येऊन छापा टाकत आहे, संगमनेरचे पोलीस मात्र झोपलेलेच आहेत की त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे असा सवाल आता जनता विचारू लागली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/ महादेव गुट्टे पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव योगेश कर्डीले चालक उत्तरेश्वर मोराळे या पथकाने ही कारवाई केली आहे.
संगमनेर शहरामध्ये गल्ली नं.06 जमजम कॉलनी येथे पत्र्याच्या शेडमध्ये नवाज जावेद कुरेशी हा साथीदारासह गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती प्राप्त झाली. पथक तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी जात असतांना पोलीसांची चाहूल लागताच तेथील इसम गल्ली बोळातून पळून गेले. सदर ठिकाणी पाहणी केली असता पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल केलेले मांस दिसून आले.

1) नवाज जावेद कुरेशी, 2) समद जावेदशी 3) नावेद जावेद कुरेशी सर्व रा. भारतनगर संगमनरे(फरार) अशी संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत.
सदर ठिकाणावरुन 2 लाख 85 हजार रुपये किमतीचे 950 किलो गोमांस, 2 हजार 200 -रु कि.चा 01 चाकू, 02 काणस व एक इलेक्ट्रीक वजन काटा असा एकुण 2 लाख 87 हजार 200/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यातील आरोपीविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं.305/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3(5) सह प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(अ), 5(ब) 5(क), 9, प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

एका आठवड्यात चार छापे – संगमनेर पोलीस मात्र निवांत
स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर कडुन संगमनेर शहरामध्ये आठवडे भरात प्राणी संरक्षण अधिनियमान्वये 04 कारवाई करुन 20 लाख 71 हजार 500/- रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पथकाने अहिल्यानगर येथून येऊन माहिती काढून हे छापे टाकले आहेत. संगमनेर पोलिसांकडून मात्र कुठलीही कारवाई होत नाही. चार कारवाया झाल्या तरी संगमनेर शहर पोलीस मात्र निवांत असल्याचे चित्र समोर आले आहे.
