भारतरत्न डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन सभा व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

संगमनेर प्रतिनिधी —

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, संगमनेर (जि. अहिल्यानगर) यांच्या वतीने मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, संगमनेर येथे भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.०० वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होईल. त्यानंतर ९.१५ वा. बौद्धाचार्य रावसाहेब पराड यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धवंदना होणार आहे. सकाळी ९.३० वा. अभिवादन सभा तसेच जीवन गौरव व प्रेरणा पुरस्कारांचे वितरण होईल.

सकाळी १०.०० वा. प्रा. व्ही. बी. अहिरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, दुर्गाताई तांबे यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमात अनिकेत घुले (अध्यक्ष, छात्रभारती महाराष्ट्र राज्य) यांना समाज प्रेरणा पुरस्कार तर भास्करराव बागुल (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते) यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या जयंती महोत्सवाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष कै. सर्जेराव गोविंदराव माघाडे यांच्या प्रेरणेने करण्यात आले असून, प्रतिष्ठानचे प्रभारी अध्यक्ष के. एस. गायकवाड, सचिव दिलीप भोरुडे, खजिनदार विनय घोसाळे, प्रा. डॉ. शशिकांत माघाडे, पत्रकार गौतम गायकवाड ॲड. अमित सोनवणे, ए.पी बनसोडे, प्रा. डॉ.सुनील अडांगळे, सचिन साळवे, कुसुमताई माघाडे, प्रा.शिशुपाल वाघमारे व सर्व पदाधिकारी, विश्वस्त, सभासद यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडणार आहे.

सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास यशस्वी करावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!